सुप्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट आणि ॲक्सिस माय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता हे निवडणुकांचा अंदाज लावण्यात माहिर असलेलं नाव. त्यांच्या संस्थेने आज असा अंदाज जाहीर केला आहे की केंद्रात सलग तिसऱ्यांदा निवडून येऊ पाहणाऱ्या भाजप प्रणित एनडीएला 13 मोठ्या राज्यांमध्ये आपली जुनी संख्या सुधारण्याची जवळजवळ शून्य शक्यता आहे. तसेच ते म्हणतात की प्रत्यक्षात त्यांच्याकडे असलेल्या काही जागा गमावू शकतात. 2019 साली एनडीएने 352 जागा मिळवल्या होत्या. म्हणजेच अब की बार 400 पारचा नारा प्रत्यक्षात आणायचा असेल तर या गटाला आणखी 48 जागा जिंकणे आवश्यक आहे. ज्याची सुतराम शक्यता नाही गुप्ता यांच्या या अभ्यासाअंती केलेल्या या अंदाजामुळे भाजपचे धाबे दणाणले असून मनी कंट्रोलसोबत त्यांनी केलेल्या बातचीतचे ट्विट त्यांनी डिलीट केले आहे. नक्कीच त्यांच्यावर 'वरून' दबाव असणार माहिती साठी:- गुप्ता यांनी मे 2023 मध्ये भाकीत केले होते की कर्नाटकात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल.