Search results for #दिनविशेष
पावन पुण्य स्मरण - 1 मई #हरदिनपावन #दिनविशेष
1 मे #दिनविशेष #आजच्यादिवशी आज आंतरराष्ट्रीय #कामगारदिन हा दिवस जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिवस. दर वर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; 1890 मध्ये जागतिक कामगारदिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला
#दिनविशेष आज १ मे, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन! महाराष्ट्र दिनाच्या आकाशवाणी पुणे परिवारातर्फे रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. #MaharashtraDin #AkashvaniPune
1 मे #दिनविशेष #आजच्यादिवशी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा... आज #महाराष्ट्रदिन म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन.
पावन पुण्य स्मरण - 30 अप्रैल #हरदिनपावन #दिनविशेष
30 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन.
30 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती.मराठीसह हिंदी,संस्कृत, गुजराती,बंगाली आदि भाषांमधील गीतांनाही त्यांनी स्वरबद्ध केले
30 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजन आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य
पावन पुण्य स्मरण - 29 अप्रैल #हरदिनपावन #दिनविशेष
पावन पुण्य स्मरण - 29 अप्रैल #हरदिनपावन #दिनविशेष
29 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्मदिन. त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.
#दिनविशेष २९ एप्रिल (२९ एप्रिल १८६७-७ एप्रिल १९३५) #भारताचे_एडिसन #शंकर_आबाजी_भिसे यांचा #जन्मदिन. वयाच्या १५ व्या वर्षी कोळश्यापासून गॅस निर्माण करणारे यंत्र त्यांनी शोधून काढले. भिसे यांच्या नावावर २०० हुन अधिक शोध तर ४० हुन अधिक पेटंट आहेत. विनम्र अभिवादन. 🙏🙏
पावन पुण्य स्मरण - 28 अप्रैल #हरदिनपावन #दिनविशेष
28 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा स्मृतीदिन.त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो.त्यांना पद्मश्री पुरस्कारानी सन्मानित केलं आहे
28 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचा स्मृतीदिन
27 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते आणि भारतीय राजकारणी विनोद खन्ना यांचा स्मृतीदिन. त्यांनी अभिनय केलेल्या लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, कच्चे धागे, परवरिश, अमर अकबर अॅन्थनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन हे चित्रपट विशेष गाजले.
27 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्मदिन. त्यांना पदश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे
27 एप्रिल #दिनविशेष #आजच्यादिवशी पद्मश्री पुरस्कार सन्मानित सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा स्मृतीदिन
आजच्या दिवशी 27 एप्रिल 1854 मध्ये पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला ! आणि पाच वर्षांपूर्वी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली! #दिनविशेष