भारताचे सर्वात शिक्षित व्यक्ती अद्वितीय ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏 भारतीय शिक्षणक्षेत्रातील , राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असणारे डॉ. श्रीकांत जिचकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.
अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. जिचकारांनी आपल्या शिक्षणाची सुरवात ही एम.बी.बी.एस अभ्यासक्रमापासून केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. त्यांनी एकूण ४२विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या.
व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह होता. #श्रीकांत_जिचकार #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन